नवी दिल्ली – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी वैयक्तिक भेटीवर गोव्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने दिली. त्या शुक्रवारी गोव्यात दाखल झाल्या आहेत.
पीटीआयशी बोलताना पोलीस उपअधीक्षक सलीम शेख म्हणाले, सोनिया गांधी यांचे काल दुपारी २.४० वाजता दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमित विमानाने आगमन झाले. त्यानंतर त्या दक्षिण गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये गेल्या.
त्यांचा हा दौरा पुर्ण खासगी आहे, कारण आत्तापर्यंत कोणत्याही अधिकृत कार्यक्रमाची माहिती त्यांच्याकडून आलेली नाही असे ते म्हणालेे. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले की गोव्यातील त्यांच्या मुक्कामादरम्यान सोनिया गांधी कोणत्याही पक्षाच्या बैठका घेणार नाहीत किंवा नेत्यांशी संवाद साधणार नाहीत.