नवी दिल्ली – वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिद संकुलावरील भारतीय पुरातत्व खात्याचा सीलबंद अहवाल लोकांसाठी खुला करायचा की नाही याचा निर्णय २४ जानेवारी रोजी घेतला जाईल असे येथील न्यायालयाने म्हटले आहे.
हा निर्णय जिल्हा न्यायाधीश ए के विश्वेश यांनी दिला आहे, असे हिंदू पक्षाचे वकील मदन मोहन यादव यांनी सांगितले.या संबंधात झालेल्या सुनावणीच्या वेळी हिंदू आणि मुस्लिम बाजूचे वकील तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे वकिल न्यायालयात उपस्थित होते.
पुरातत्व खात्याने मशिद संकुलात जाऊन वैज्ञानिक स्वरूपाचे सर्वेक्षण केले आहे. या जागी पुर्वीच्या काळी मंदिर अस्त्विात होते आणि ते पाडून तेथे आक्रमकांनी मशिद बांधली असा आक्षेप आहे. त्यासंबंधात पुरातत्व खात्याचा हा अहवाल महत्वाचा ठरणार आहे. तो अहवाल सध्या सीलबंद स्वरूपात आहे.