विंडीज क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी ‘ट्रेव्हर पेनी’

सेंट जोन्स (एंटीगा) : भारतीय संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांची वेस्टइंडिजच्या एकदिवसीय टी-२० क्रिकेट संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधी वाॅरिकशायर संघाचे माजी क्रिकेटपटू पेनी यांच्याशी वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने २ वर्षाचा करार केला आहे.

पेनी हे जानेवारीपासून वेस्टइंडिज संघाचा सहाय्यक प्रशिक्षकपदाचा पदभार हाती घेतील. तेव्हापासून विंडीजचा संघ आर्यलंड विरूध्दच्या मालिकेसाठी सराव सुरू करणार आहे. ७ ते १९ जानेवारी दरम्यान होणा-या या मालिकेत ३ एकदिवसीय व ३ टी-२० सामने होणार आहेत.

दरम्यान, पेनी हे १७ वर्ष इंग्लंडमध्ये वॉरिकशायर कौंटीकडून खेळले असून २००५ अॅशेेस मालिकेत ते इंग्लंडकडून बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात उतरले होते. पेनी यांनी वाॅरिकशायर कडून १५८ प्रथम श्रेणी आणि २९१ लिस्ट ‘ए’ सामने खेळले असून त्यांना प्रशिक्षकपदाचा दीर्घ अनुभव आहे.

फ्लेचर जेव्हा इंग्लंडचे प्रशिक्षक होते तेव्हादेखील त्यांच्यासोबत पेनी हे इंग्लंडचे अर्धवेळ क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून होते. टॉम मूडी यांनी श्रीलंकन संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतल्यावर पेनी श्रीलंकन संघाचे प्रशिक्षक मूडी यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले.

आयपीएल मध्येही त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाब, डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाइटरायडर संघाचे सहाय्यक प्रशिक्षकपद भूषविले आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.