सातारा, (प्रतिनिधी) – जळगाव येथे होणार्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ संघात सातारा येथील साईराज युवराज जाधव याची निवड झाली आहे.
साईराज जाधव हा कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये बीसीएच्या दुसर्या वर्षात शिकत आहे. सांगली येथे झालेल्या निवड चाचणीत त्याने उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केली.
या कामगिरीच्या जोरावर त्याची विद्यापीठ संघात निवड झाली आहे. विद्यापीठ क्रिकेट संघात निवड झालेला साईराज हा केबीपी इन्स्टिट्यूटचा पहिलाच खेळाडू आहे. एसटी महामंडळाच्या सातारा आगाराचे कर्मचारी आणि क्रिकेटपटू युवराज जाधव यांचा तो सुपुत्र आहे. त्याचबरोबर टीसीसी युवी क्लबचा क्रिकेटपटू आहे.
या निवडीबद्दल साईराजचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, केबीपी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बी. एस. सावंत, जिमखानाप्रमुख प्रा. गौरव जाधव, सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी, सचिव इर्शाद बागवान, सातारचे माजी रणजीपटू केतन दोशी, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, संदीप पाटील, मिलिंद घाडगे, राजू जाधव, इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, क्रिकेटपटूंनी अभिनंदन केले.