#CWC19 : न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टची हॅट्ट्रिक

लॉर्डस – न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट याने यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेतील दुसरी हॅट्ट्रिक नोंदवित इतिहास घडविला. मात्र, उस्मान ख्वाजा (88) व ऍलेक्‍स केरी (72) यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळेच ऑस्ट्रेलियास न्यूझीलंडपुढे 244 धावांचे आव्हान ठेवता आले. त्यांनी 50 षटकांत 9 बाद 243 धावा केल्या.

वेगवान गोलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर बोल्ट याने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 50 व्या षटकांत ही कामगिरी केली. त्याने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ख्वाजा याचा त्रिफळा उडविला. पुढच्या चेंडूवर त्याने मिचेल स्टार्क याचेही दांडकेच उडविले. पाठोपाठ त्याने जेसन बेहनड्रॉफ याला पायचित केले. न्यूझीलंडकडून विश्‍वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक करणारा बोल्ट हा पहिलाच गोलंदाज आहे. यंदाच्या स्पर्धेतील ही दुसरी हॅट्ट्रिक आहे.

याआधी भारताच्या मोहम्मद शमी याने अफगाणिस्तानविरुद्धा हा मान मिळविला होता. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. डेव्हिड वॉर्नर ब कर्णधार ऍरोन फिंच यांच्यासह त्यांचा निम्मा संघ 92 धावात कोसळला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.