‘जन, जन जुडेगा जल बचेगा’ – दुष्काळावर मात करण्यासाठी मोदींनी दिला संदेश

नवी दिल्ली – दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ यात्रा, पाणी आणि योगा विषयांवर ‘मन की बात’ केली. ‘मी सत्तेत आलो नाही तर लोकांनी मला निवडून दिलं. देशातील जनतेला विकास हवा आहे. त्यांच्या सेवेची मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले.

देशात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक भागांमध्ये दुष्काळ या दुष्काळाबाबत मोदी यांनी म्हटलं आहे की,’जन, जन जुडेगा जल बचेगा या संदेशावर भविष्यात अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी ज्या संस्था, लोक पुढाकार घेत आहेत त्यांची माहिती गोळा करण्याचं आवाहन देखील त्यांनी या वेळी केलं आहे. सर्वांनी पावसाचं पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून सोशल मीडियावर #JanShakti4JalShakti वापरून आपला मजकूर अपलोड करण्याचं आवाहन देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.