‘दंगल’ गर्ल झायराने घेतला बॉलिवूड सोडण्याच्या निर्णय

दंगल, सिक्रेट सुपरस्टार यासारख्या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिमने आपण नैराश्‍याचा सामना करत असल्याचे सांगितले. आपण डिप्रेशनमध्ये असल्याचा स्वीकार अखेर चार वर्षांनंतर केल्याचे झायरा सांगते. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून झायराने ही गोष्ट सांगितली आहे. झायरा वसीमला “दंगल’मध्ये आमिर खानसोबत उत्कृष्ट डावपेच खेळताना सर्वांनी पाहिले आहे. तसेच या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर केलेली कमाई देखील जबरदस्त आहे. मात्र, चित्रपटात कठिण प्रसंगांना सामोरे जाणारी झायराने धक्‍कादायक व्यक्तव्य करत बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on


झायराने ट्‌विट करत सांगितले की, ‘5 वर्षांपूर्वी माझा नवा प्रवास सुरू झाला, बॉलिवूडमध्ये मी प्रवेश केला. आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. या क्षेत्रानं मला खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळालं. पण त्यासोबतच मी शांतपणे किंवा अजाणतेपणे ‘इमान’च्या मार्गावरून बाजूला गेले. माझ्या इमानात ढवळाढवळ करणाऱ्या वातावरणात मी सातत्यानं काम करत राहिले. माझ्या धर्माशी असलेल्या माझ्या नात्यालाच आव्हान निर्माण झालं. माझ्या धर्माची जी मूलभुत तत्व आहेत, त्याचं मला ज्ञान नव्हतं याची जाणीव झाली. आत्म्याच्या आवाजापासून दूर जाऊन घुसमट होते, या घुसमटीत जगणं असह्य आहे. महान आणि दैवी कुराणाच्या सान्निध्यात मला समाधान आणि शांती मिळते. मनाला खरोखर तेव्हा शांती मिळते जेव्हा त्याला निर्मात्याची ज्ञानप्राप्ती होते.’

Leave A Reply

Your email address will not be published.