भुईंज येथे ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

भुईंज – ग्वाल्हेर बंगळुर आशियाई महामार्गावर भुईंज गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने लक्‍झरी बस समोर चालेल्या कंटेनरवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. सौ. सुवर्णा दिनेश मांढरे (वय 41), दिनेश मांढरे, रघुनाथ लोहकरे, लक्ष्मी चंद्रकांत जाधव (राहणार जाधववाडी, चिखली, ता. जि. पुणे), श्‍वेता मिलिंद जाधव (रा. जाधववाडी पुणे) अशी अपघातील जखमींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, पुणे येथील 35 जण नरसोबाची वाडी व गोवा येथे पर्यटनासाठी निघाले होते. त्यांची लक्‍झरी भुईंज गावच्या हद्दीत आली असताना पहाटेच्यावेळी चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स समोर चालेल्या कंटेनरला धडकली. या भीष अपघातात ट्रॅव्हसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, या ट्रॅव्हल्समधून 35 प्रवासी प्रवास करत होते. गोविंद रावसाहेब काळे (वय 36, रा. देवाची आळंदी) असे चालकाचे नाव आहे. सौ. सुवर्णा मांढरे यांनी अपघाताची तक्रार नोंदविली असून भुईंज पोलीस अधिक तपास घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)