सत्यजीत रे यांच्या कथांवर आधारित “रे’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयी, अली फजल, के के मेनन, हर्षवर्धन कपूर, राधिका मदन हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. नेटफ्लिक्सवरच्या या सिनेमामध्ये 4 वेगवेगळ्या कथा दाखवण्यात येणार आहेत.
View this post on Instagram
या चारही कथांचे दिग्दर्शन अभिषेक चौबे, श्रीजित मुखर्जी आणि वासन बाला यांनी केले आहे. या ट्रेलरला मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतीसाद देखील खूप चांगला आहे. “रे’चा प्रिमियर 25 जूनला नेटफ्लिक्सवर होणार आहे. मनोज वाजपेयीच्या “द फॅमिली मॅन’लाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
View this post on Instagram
याशिवाय त्याच्यासाठी आणखीन एक खूषखबर आहे. त्याची पहिली मालिका असलेली “स्वाभिमान’ आता पुन्हा दाखवली जाणार आहे. महेश भट यांचे दिग्दर्शन असलेली ही मालिका आता एका चॅनेलवरून पुन्हा दाखवायला सुरूवात झाली आहे. “स्वाभीमान’ 1995 पासून 1997 पर्यंत चालली होती आणि 500 एपिसोड पूर्ण करणारी ती पहिली मालिका ठरली होती. या मालिकेचे 800 एपिसोड झाले होते.