16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन, 53 केंद्रांवर कोविशिल्ड मिळणार
पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे शुक्रवारी 16 केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि 55 केंद्रांवर कोविशील्डची लस मिळणार आहे. कोव्हॅक्सिन ही लस केवळ दुसरा डोस घेतलेल्यांनाच मिळणार असून, 14 मे आणि त्या आधी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळणार आहे. या लसीसाठी 60 टक्के बुकिंग आणि उरलेली 40 टक्के ऑन दी स्पॉट येणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे.
कोविशील्ड लसीचेही तसेच असून प्रथम प्राधान्य हे दुसरा डोस घेणाऱ्यांना असेल. ज्यांनी 19 मार्चपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळेल. याशिवाय, 60 टक्के लस ही 45 वर्षे वयापुढील नागरिकांसांठी पहिला डोस मिळेल. 60 टक्के लस ही 45 वर्षे पुढील नागरिकांना पहिल्या डोससाठी दिली जाईल. मात्र, यासाठी ऑनलाइन बुकींग आवश्यक आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता त्याचे ऑनलाइन बुकिंग करता येऊ शकणार आहे.
उर्वरित लस ही दिव्यांग, स्तनदा माता, हेल्थकेअर, फ्रंट लाइन वर्कर्स यांना प्राधान्याने दिली जाईल. याशिवाय, ज्या नागरिकांनी नोंदणी केली नाही परंतु, ते केंद्रांवर आले असतील आणि लस शिल्लक असेल तर त्यांना “ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून ती देण्यात येईल. याशिवाय, सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या व्हायलमध्ये जर डोस शिल्लक राहिला तर त्याचीही “ऑन दी स्पॉट’ नोंदणी करून ती दिली जाणार आहे, जेणेकरून लस वाया जाऊ नये.
…येथेही मिळणार लस
महापालिकेच्या 53 केंद्रांशिवाय येरवड्यातील मनोरुग्णालय, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे स्टेशन येथील रेल्वे रुग्णालय, वानवडीतील एसआरपीएफ, शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटल, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), ससून सर्वोपचार रुग्णालय येथेही प्रत्येक केंद्रावर कोविशील्डचे 100 डोस देण्यात आले आहेत.