मुंबई – अभिनेता अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही उत्सुकता लक्षात घेऊन काल या बहुप्रतिक्षित पृथ्वीराज चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्यासाठी सज्ज झाला आहे.
ट्रेलर लॉन्चदरम्यान अक्षय कुमार भावूक झाला होता. त्याचे डोळेही पाणावले होते. अक्षय कुमारने या चित्रपटाला शैक्षणिक चित्रपट म्हटले आहे. एवढेच नाही तर शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहणे अनिवार्य करावे, अशी विनंतीही अक्षयने सरकारकडे केली आहे. पृथ्वीराज हा चित्रपट चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिग्दर्शित केला आहे, जो पृथ्वीराज रासोवर यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे.
पृथ्वीराज रासो ही ब्रज भाषा कविता आहे, जी १२ व्या शतकातील शासक पृथ्वीराज चौहान यांची कथा सांगते. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अक्षय कुमारने प्रत्येक मुलाने ‘पृथ्वीराज’ चित्रपट पाहावा अशी त्याची इच्छा व्यक्त केली.
अक्षय कुमार म्हणाला,’जेव्हा आपण इतिहासाची पुस्तके वाचतो तेव्हा त्यात त्यांच्याबद्दल एकच परिच्छेद असतो. केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक मुलाने हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे.’
अक्षय कुमार पुढे म्हणाला की, ‘हा एक शैक्षणिक चित्रपट आहे. प्रत्येक मुलाने हा चित्रपट पाहावा अशी माझी इच्छा आहे. आणि हा चित्रपट शाळांमध्ये दाखवला जावा, अशी विनंती मी सरकारला करेन. अक्षय कुमारनेही या चित्रपटात काम करताना खूप अभिमान वाटत असल्याचे सांगितले.’
अक्षय कुमार ‘पृथ्वीराज’ यांची भूमिका साकारतोय. त्याचबरोबर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर राजकुमारी संयोगिताच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय सोनू सूद कवी चंद्रवरदाई आणि संजय दत्त काका कान्हाची भूमिका साकारत आहे. याशिवाय या चित्रपटातील मानव विज ही महत्त्वाची व्यक्तिरेखा मोहम्मद गौरीची आहे.