#ICCWorldCup2019 : पावसामुळे पाकिस्तान वि. श्रीलंका सामना सुरु होण्यास विलंब

ब्रिस्टॉल – इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर मात देत पाकिस्तानने सर्वांना चकित केले असले तरीही जिगरबाज खेळाडूंचा समावेश असलेल्या श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविण्यासाठी पाकिस्तानची आज खडतर परीक्षा असणार आहे.

लडंन मधील ब्रिस्टल शहरातील काउंटी मैदानावर आज पाकिस्तान विरूध्द श्रीलंका हा सामना होणार आहे. मात्र पावसाचा अडथळा असल्याने नाणेफेकीला आणि सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे.

दरम्यान, वेस्ट इंडिजकडून लाजिरवाणा पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानने इंग्लंडवर सनसनाटी विजय मिळविला आहे. त्यांच्यासाठी हा आत्मविश्‍वास उंचविणारा विजय आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानला हरविले आहे. ही त्यांच्यासाठी समाधानाची बाजू आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.