‘हम करे सो कायदा’ असे भाजपचे ब्रिद वाक्य -राष्ट्रवादी काँग्रेस

नाशिक: ‘हम करे सो कायदा’ असे ब्रिद वाक्य असलेल्या या भाजप सरकारने आतापर्यंत सर्वच निर्णय जनतेवर लादले आहेत. मग हे निर्णय लादताना सरकारने कोणताही विचार केला नाही. अगदी ‘भविष्या’चाही नाही! मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेवरही सरकारने बुलडोझर चालवला आहे. या शाळेवर बुलडोझर चालवून सरकारने अनेक स्वप्नांचाही चुराडा केला आहे. शाळेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी जमीन देऊ, असे तोंडी आश्वासन दिले असले तरी ते पूर्ण होईल की नाही, याची कोणतीच खात्री नाही. मात्र मुलांचे भविष्य उद्धवस्त करून समृद्धी कशी होणार असा प्रश्न मनाला भेडसावत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

यापूर्वी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे होता.

नागपूर द्रुतगती महामार्ग अर्थात समृद्धी महामार्गासाठी नाशिक-ठाणे दरम्यानच्या कामांसाठी सुमारे ३८५.६१ हेक्टर वनक्षेत्र हस्तांतरीत करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील ३४५ हेक्टर, शहापूर तालुक्यातील ३१९ हेक्टर, कल्याण तालुक्यातील २६ हेक्टर इतक्या वनक्षेत्राचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.