पुणे – विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पुण्यात सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहराच्या मध्यवर्ती भागासह सिंहगड रोड, कात्रज, कोथरूड, वारजे, पाषाण भागात पडलेल्या पावसाने रस्ते जलमय झाले. त्यामुळे पुणेकरांची धांदल उडाली. लवळे येथे सर्वाधिक 18, तर एनडीए परिसरात 9 मिमी पावसाची नोंद झाली.
शनिवारी (दि. 20) सकाळपासून ऊन आणि ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चार वाजल्यापासून कात्रज, धनकवडी, सिंहगडरोड भागांत ढग दाटून आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. शिवाजीनगर परिसरातील बहुतांश भाग, सिंहगड रोड, धनकवडी, आंबेगाव, कात्रज, नऱ्हे, धायरी, नांदेड सिटी, वारजे, कर्वेनगर, कोथरूड, चांदणी चौक, एनडीए, बावधन, पाषाण, सुस, औंध या भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शहराच्या पूर्व भागात जोरदार पाऊस झाला. तर आज शहराच्या पश्चिम भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान, काही मिनिटे झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. हवेत गारवाही पसरला. सायंकाळी अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून वाहने घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागली. तसेच सिंहगड रस्ता, वारजे, पौड रोड, कर्वे रोड, कात्रज या भागात वाहतुक कोंडी झाली होती.
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिमी मध्ये)
लवळे – 18, गिरीवन – 12.5, एनडीए – 9, पाषाण – 4.5, शिवाजीनगर – 2 तर राजगुरू