जुन्नरला महिलेची निर्घृण हत्या

जुन्नर  – जुन्नर लगतच्या बादशाह तलाव येथील राहत्या घरात 32 वर्षीय विवाहित महिलेच्या डोक्‍यात लोखंडी सळई मारून तिचा खून शेजारी राहणाऱ्यांनी केल्याची घटना शनिवारी (दि. 24) सकाळी घडली. या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या संख्येने समाज बांधव जमलेले होते.

निकत अशरफ शेख असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आपल्या घरामध्ये सकाळी सहाच्या सुमारास चटईवर बसून नमाज पडत असताना त्यांच्या शेजारी राहणारे लतीफ मोहम्मद मेहबूब पठाण तसेच नूर मोहम्मद मेहबूब पठाण, पीर मोहम्मद मेहबूब पठाण यांनी एकत्रित येऊन या महिलेवर हल्ला केला. यावेळी घरात येऊन लतीफ याने लोखंडी जाड सळई डोक्‍यामध्ये मारल्यामुळे ह्या महिलेने जागीच प्राण सोडले.

या दोन कुटुंबांमध्ये अगोदरपासून कुरबुरी होत असून अनेकदा भांडणे झाल्याचे या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेची फिर्याद इमरान अन्वर शेख यांनी जुन्नर पोलिसांकडे नोंद केली आहे. यामध्ये हत्या झालेल्या महिलेचे कुटुंब सर्वसामान्य असून आठवडे बाजारात विविध वस्तूंची विक्री करून हे कुटुंब उदरनिर्वाह करते. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक मुकुंद पालवे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)