कॉंग्रेसमध्येच घराणेशाहीवरून चिखलफेक

झेडपी स्थायी समिती सदस्यपदावरून पाटील- झुरुंगे यांच्यामध्ये जुंपली

रेडा – जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये सदस्यपदासाठी रिक्‍त झालेल्या जागेवरून कॉंग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे व अंकिता पाटील यांची चांगलीच जुंपली असून घराणेशाहीच्या मुद्द्यावरून एकमेकांवर चिखलफेक सुरू केली आहे. झुरुंगे यांनी शनिवारी (दि. 24) तर रविवारी (दि. 25) पाटील यांनी थेट नाराजी व्यक्‍त केल्याने हे कॉंग्रेसमधील अंतर्गत राजकारण कोणत्या स्तरावर जाते हे पाहणे आता औत्सुक्‍याचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अंकिता पाटील म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यपदी माझी निवड होऊ नये म्हणून षड्‌यंत्र रचले गेले. सदस्यपदी संधी दिल्याचा आदेश प्रदेश कॉंग्रेस कमिटीने गुरुवारी (दि. 22) सकाळी साडेदहा वाजता कळवला. त्याचे पत्र जिल्हाध्यक्ष यांनाही प्रदेश कॉंग्रेसने सकाळीच पाठवले.असे असताना दुपारी 12 वाजता जिल्हाध्यक्षांच्या पत्रानुसार दत्ता झुरंगे यांनी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा आदेश जिल्हाध्यक्षांनी डावलणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या घराणेशाही बाबत बोलणाऱ्या पुरंदरच्या दत्ता झुरुंगे यांनी त्यांच्या नेत्यांच्या घराणेशाहीकडे पहावे, असा सल्लाही यावेळी पाटील यांनी दिला. मी एक युवती असून स्थायी समितीच्या सदस्यपदी काम करण्यास सक्षम आहे, त्यामुळे घराणेशाही नव्हे, तर क्षमता पाहूनच प्रदेशशाध्यक्ष थोरात यांनी अर्ज भरण्याचा आदेश दिला, त्याचे मी पालन केले, असे अंकिता पाटील यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे हे कृषी समितीचे सदस्य आहेत. एका समितीच्या सदस्याला दुसऱ्या समितीवर सदस्य म्हणून घेता येत नाही. त्यामुळे षड्‌यंत्र रचून आदल्या एका दिवसात संध्याकाळी त्यांचा राजीनामा घेऊन तात्काळ दबावाने मंजूर करण्यात आला. नियमानुसार कृषी समितीच्या बैठकीतच राजीनामा मंजूर करावा लागतो व नंतर जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे लागते. एका दिवसात राजीनामा प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने पूर्ण करणे हे षड्‌यंत्र असल्याचा आरोप अंकिता पाटील यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)