१. शिंदेंचा दसरा मेळाव्यावरही दावा
दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यात रस्स्सीखेच सुरु झाली आहे. शिंदे गटाकडून शुक्रवारी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज दाखल करताना दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्ज केला असून आमचे नेते एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने यापूर्वीच अर्ज केला असून आता शिंदे गटातर्फे देखील दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केल्याने मुंबई महापालिका कोणाला परवानगी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२. शिंदेंच्या दसरा मेळवाव्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ? ( Top 10 Marathi News )
शिंदे गटाने शुक्रवारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. शिंदे गटाने अर्ज दाखल केला असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्विट केलं असून यामुळे शिंदेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी मुख्ह्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांची बभेत घेतली होती, यानंतर आज शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला, त्यानंतर मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे दसरा मेळावा घेण्याची साद घातली आहे, हा घटनाक्रम पाहता शिंदेंच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
३. दसरा मेळाव्यावरून तेढ वाढवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न – शिवसेनेची प्रतिक्रिया
शिंदे गटाने दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेल्या अर्जावर शिवसेनकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो मात्र शिंदे गट जाणूनबुजून तेढ वाढवण्याच्या उद्देशाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत असल्याचं शिवसेना नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलं आहे.
४. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट होणार? Top 10 Marathi News
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या ५ सप्टेंबरला गणेशोस्तवानिमित्ताने मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. राज्यात झालेले सत्तांतर, आगामी मुंबई माहापालिका निवडणुका यांमुळे अमित शहा यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या महत्वाचा असणार आहे. अशातच अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना त्यांची राज ठाकरेंसोबत भेट व्हावी यासाठी महाराष्ट्र भाजपचे व मनसेचे नेते प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे. राज ठाकरे व भाजप नेत्यांच्या गेल्या काही दिवसांतील गाठीभेटींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते, अशातच आता शाह – ठाकरेंच्या भेटीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
५. मी राजीनामा देतो, अन् तुम्ही द्या. आत्ताच निवडणूक होऊद्या – राम शिंदेंचं रोहित पवारांना खुलं आव्हान
लोकांच्या मनात काय चाललंय? हे मी रोज बघतोय, ऐकतोय. लोकांची मन जिंकण्यासाठी खूप मोठं मन लागतं. आमदारांच्या निवडणुकीत 30 आमदारांनी मते मला दिलीत अन् सर्वाधिक मतांनी मी निवडून आलोय, मग याला काय मागचं दार म्हणतात का? असा टोला रोहित पवारांचे नाव न घेता विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी लगावला. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी, आता लोकं विचार करतात की, सन 2024 ला निवडणूक झाल्यावर काय होईल? माझं तर म्हणणं आहे आत्ताच निवडणूक होऊद्या, मी राजीनामा देतो अन् तुम्हीही राजीनामा द्या, असे खुले आव्हानच आमदार रोहित पवारांना दिले.
६. देवेंद्र फडणवीस – अशिवक चव्हाणांची भेट; चर्चांना उधाण Top 10 Marathi News
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भेटीचे वृत्त समोर आल्याने काँग्रेससमधील एक नाराज गट भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा नव्याने रंगल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या बभेटीचे वृत्त समोर आल्याने विविध तर्क वितर्क लढवले जातायेत. मात्र दोन्ही नेत्यांनी हे वृत्त फेटाळले असून गणेशोस्तवाच्या कार्यक्रम एकत्र येणं म्हणजे भेट नव्हे असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकांपासून काँग्रेसमधील एक नाराज गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
७. भारतीय नौदलाचा ध्वज शिवरायांनी समर्पित – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतीय नौदलाला अखेर गुलामगिरीतून मुक्तता मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वज चिन्हाचे अनावरण केले आहे. नौदलाचे हे नवे ध्वज चिन्ह पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केले आहे. शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. यावेळी भारतीय नौदलातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे मोदींकडून स्मरण करण्यात आले. यावेळी पीएम मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलातील कार्याचा उल्लेख करत म्हटले की, भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची खूण होती. मात्र यापुढे नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे प्रतीक फडकणार आहे. आज मी नवा ध्वज नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करतो.
८. विरोधी पक्षांची सरकारे रिसेट करण्यातच भाजप व्यस्त Top 10 Marathi News
भारताच्या आर्थिक विकास दरावरून कॉंग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारकडून विकासाचे मोठे दावे केले जात आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था तीन टक्क्यांपेक्षा कमी वेगाने वाढली आहे हेच सत्य आहे. याचा अर्थ तीन वर्षांपूर्वी ज्याचे उत्पन्न 10 हजार रूपये होते त्याचे आताचे उत्पन्न 10 हजार 300 रूपये फक्त झाले आहे अशी टीका कॉंग्रेसचे गौरव वल्लभ यांनी केली आहे. मोदी सरकारने भारताची अर्थव्यवस्था रिसेट करण्याची गरज होती. मात्र ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत ती सरकारे रिसेट करण्यातच ते गुंतले आहेत. असा टोलाही वल्लभ यांनी लगावला.
९. अमेरिकेत बेरोजगारीचे संकट
अमेरिकेतील उद्योगांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात नोकरभरतीमध्ये तब्बल 40 टक्क्यांची कपात केली आहे. वाढलेले व्याजदर, मोठी चलनवाढ आणि ग्राहकांकडून कमी खरेदी या कारणांमुळे तेथील अर्थव्यवस्था मंदावली असल्याने उद्योग क्षेत्राने सावधगिरी बाळगली आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये तेथे 3 लाख 15 हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या. जुलैमध्ये हा आकडा 5 लाख26 हजार इतका होता. त्यापूर्वीच्या 3 महिन्यांच्या सरासरीपेक्षाही ऑगस्टमधील आकडा कमी आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर सध्या 3.7 टक्के झाला आहे. जुलैमध्ये तो 3.5 टक्के होता.
१०. चहर, अय्यर व किशनला स्थान मिळणार? Top 10 Marathi News
विश्वकरंडकासाठी लवकरच होणार भारतीय संघाची घोषणा
ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या संघात दीपक चहर, श्रेयस अय्यर व इशान किशन यांच्यासह अन्य काही नवोदित खेळाडूंना स्थान मिळणार का याची उत्सूकता आहे. भारतीय संघ सध्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळत असून सुपर-4 मध्ये संघाने स्थान निश्चित केले आहे. मात्र, ही स्पर्धा आगामी विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम समजली जात असल्याने या स्पर्धेतील कामगिरीचा विश्वकरंडक संघात स्थान मिळवण्यासाठी कोणाला लाभ होणार याकडे सध्या लक्ष लागले आहे.
latest marathi news marathi batmya marathi news live news in marathi Thalak Ghadamodi top 10 marathi news