पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ
जामखेड: कर्जत जामखेडच्या भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शुक्रवारी सिद्धटेक (ता कर्जत) येथे होणार आहे. यावेळी राम शिंदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यात विधानसभेचा बिगुल वाजला असून दि २१ रोजी मतदान पार पडणार आहेत. राज्यात मंगळवार पासून प्रचाराची सुरुवात झाली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील युतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा शुक्रवार दि ११ रोजी दुपारी १२:३० वाजता सिद्धटेक येथे होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कर्जत भाजपाच्यावतीने करण्यात आले आहे.