नगर – एका पतसंस्थेने दुसर्या पतसंस्थेत ठेवलेली ठेवी परत न करता ४९ लाखा ५४ हजार ९६१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को आॅप क्रेडीट सोसायटी लि. (शाखा गुलमोहर रोड, सावेडी) तसेच सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, शाखाधिकारी अशा १८ जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द्न्यानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व सचिव धोंडीराम शंकर राऊळ यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. श्री महालक्ष्मी मल्टिस्टेट को आॅप क्रेडीट सोसायटी लि. शाखेचे संस्थापक अध्यक्ष हेमा सुरेश सुपेकर रा. नगरा), उपाध्यक्ष अशोक गंगाधर गायकवाड(रा. नवलेनगर गुलमोहर रस्ता, सावेडी), संचालक राहुल अरुण दामले (रा. प्रोफेसर चौक), मनिष दत्तात्रय कुटे (रा. डी.पी रस्ता औंध, पुणे), राजेंद्र सुखलाल पारख (रा. ख्रीस्तगल्ली, नगर), अजय चंद्रकांत आकडे (रा. महात्मा फुले चौक,नगर), मधुकर मारूतीराव मुळे (रा. माळीवाडा), प्राजक्ता प्रकाश बोरूडे, रा. नगर), नवनाथ भिकाजी शेटे (रा. सावेडी), विजय बन्सीलाल मुनोत (रा. माळीवाडा), संजय चंद्रकांत खाडे (रा.सावेडी), मच्छिंद्र भिकाजी खाडे, रा. सावेडी), शामराव हरी कुलकर्णी, रा. सावेडी), सुनील रंगनाथ वाघमारे (नगर), शाखाधिकारी शैलेंद्र द्न्यानेश्वर सुपेकर, अशांवर गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
राऊळ हे सन २००१ पासून द्न्यानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत संचालक व सचिव म्हणून काम पाहतात सदरची पतसंस्था सभासदाकडून ठेवी गोळा करून कर्ज वाटप करण्याचा व्यवसाय करत असते. या पतसंस्थेचे संचालक अशोक गायकवाड हे श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटचे संचालक व उपाध्यक्ष आहेत. गायकवाड व श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटचे इतर संचालक यांनी द्न्यानेश्वरर नागरी सहकारी पतसंस्थेत जममा असलेल्या ठेवीच्या रकमा श्री महालक्ष्मी मल्टिस्टेटमध्ये ठेव म्हणून ठेवल्यास संस्थेला चांगला आर्थिक फायदा होइल असे अमिष दाखवले. याबाबत काही संचालकांनी त्यास हरकत घेतली. मात्र आशोक गायकवाड याने त्याच्या अधिकाराचा दुरूपयोग करून २ आॅगस्ट २०१६ रोजी २० लाख ३२ हजार ८७५ रुपये व १० सप्टेंबर २०२६ रोजी २९ लाख २१ हजार ४८६ रुपये काम ठेवण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.