टोकियो – भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिला टोकियो ऑलिम्पिकमधील महिलांच्या 200 मीटर शर्यतीत पराभवाचा सामना करावा लागला. तिच्या अपयशामुळे या स्पर्धेतील तिचे आव्हान संपुष्टात आले आहे.
दुतीला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दुतीला उपांत्य फेरी गाठता आली नसली तरीही तिने या स्पर्धेत नवीन विक्रमाची नोंद केली. तिने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. सोमवारी या स्पर्धेच्या दहाव्या दिवशी दुती चंद आणि कमलप्रीत कौर यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलेले होते.
दुतीला महिलांच्या 200 मीटर शर्यतीत उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. दुतीने महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत सातवे स्थान मिळवले. हे अंतर पूर्ण करताना तिने 23.85 सेकंदांचा वेळ नोंदवला. दुतीने केलेली ही तिची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे.
नामिबियाच्या क्रिस्टीन मबोमाने 22 मिनिटं 11 सेंकदांत शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावला, तर अमेरिकेच्या गॅब्रियल थॉमस (वेळ 22.20 सेकंद) दुसऱ्या आणि नायजेरियाची अमिनातू सेयनी (वेळ 22.72) तिसऱ्या स्थानी राहिली.