टोकियो -अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू केलेब ड्रेसेल याने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील जलतरणात सहावे सुवर्णपदक पटकावण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.
4 बाय 100 मीटरच्या नवीन मिश्र मिडले रिलेमध्ये सहावे सुवर्णपदक जिंकत त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली. या गटात खेळाडू उतरण्यापूर्वीच अमेरिकेचा संघ पिछाडीवर होता.
या मिश्र संघात दोन महिला आणि दोन पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ब्रिटनने सुवर्णपदक जिंकत विश्वविक्रम केला. ड्रेसेलने 100 मीटर बटरफ्लायमध्ये विश्वविक्रम साकारत तिसरे सुवर्णपदक जिंकले होते.
दुसरीकडे केटी लेडेकीने 800 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळवून ऑलिम्पिकचा शेवट गोड केला.