Tokyo Olympics : तिरंदाजीत अतानू दासची आगेकूच

टोकियो – ऑलिम्पिकमधील पुरुषांच्या तिरंदाजीच्या 1/32 स्पर्धेत भारताच्या अव्वल पुरुष तिरंदाज अतानू दासने चिनी तैपेईच्या ऑलिम्पिकमधील पुरुष संघाचे रौप्यपदक विजेता डेंग यू-चेंगचा 6-4 असा पराभव केला.

अतनूने 10 ने सुरुवात केली आणि त्यानंतर पहिला सेट 27-26 ने जिंकला, तर दुसरा सेट त्याने 28-26 असा जिंकला. यानंतर डेंग यू-चेंगने 4-4 अशी बरोबरी साधली. अखेर पाचव्या आणि निर्णायक सेट अंतानूने 28-26 असा जिंकत विजयावर शिक्‍कामोर्तब केला.

नेमबाजीच्या पुरुष एकेरीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये भारताच्या अतानू दासने दक्षिण कोरियाच्या जिन्हा एक याच्यावर 6-5 ने मात दिली आणि पुढील फेरीत प्रवेश केला. अतानू दासने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.