आजचे भविष्य (बुधवार, 7 जुलै 2021)

मेष : व्यवसाय नोकरीत अडथळयांवर मात कराल. कामात बदल करून काही ठोस पावले उचलाल.

वृषभ : कामाचे वेळी काम व इतर वेळी आराम असे धोरण असेल. व्यवसायात नवीन जबाबदारी स्विकाराल.

मिथुन : पूरक ग्रहमान लाभल्याने कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. व्यवसायात कर्तव्याला प्राधान्य दयाल.

कर्क : व्यवसाय नोकरीत विस्ताराचे बेत सफल होतील. पूर्वी केलेल्या कामातून पैसे मिळतील.

सिंह : परदेशव्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांनी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नयेत.

कन्या : उत्साहवर्धक वातावरण लाभेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

तूळ : व्यवसाय वृद्धिंगत करण्याकडे कल राहील. दिवसाचे 24 तासही कमी पडतील.

वृश्‍चिक : तुमचा उत्साह वाढवण्याऱ्या घटना घडतील. व्यवसायात तुमच्या उदयोगप्रिय स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल.

धनु : तुमच्या स्वच्छंदी स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील.

मकर : व्यवसायात/ नोकरीत व्यवहारी धोरणाचा अवलंब करून फायदा मिळवाल.

कुंभ : उत्तेजन देणारे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःचे विचार सौम्य पण प्रभावीपणे मांडून व्यवसायात प्रगती कराल.

मीन : तुमच्यातील रसिक व कल्पकतेला दाखवण्याचीसंधी मिळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.