मेष : नोकरीत मनाला जे पटेल तसेच वागा. घरात भावनेच्या भरात जाऊन निर्णय घेऊ नका.
वृषभ : कुटुंबासमवेत वेळ मजेत जाईल. बोलण्याचे तारतम्य बाळगा. व्यवसायात जुनी येणी वसुल होतील.
मिथुन : कार्यमग्न राहून प्रगती करण्याचा प्रयत्न राहील. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात असतील.
कर्क : कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द मानतीलच हे गृहीत धरु नका.
सिंह : चिडचिड न करता कामाची आखणी योग्य प्रकारे करा. तुमच्या कामात कसूर होऊ देऊ नका.
कन्या : घरात जादाची कामे करुन दमणूक होईल. तरुणांनी अतिधाडस करु नये. प्रकृतीची काळजी घ्या.
तूळ : कामात हलगर्जीपणा न करता स्वतःची कामे स्वतः करा. वरिष्ठांच्या हेकेखोर स्वभावामुळे त्रास होईल.
वृश्चिक : व्यवसायात पैशाचे ठोकताळे चुकल्याने कामांना विलंब होईल. काही बेत पुढे ढकलावे लागतील.
धनू : धंद्यात योग्य वेळी योग्य कृती करुन प्रगती साधा. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल.
मकर : तुमची चिडचिड होईल. घरात मोठयांच्या प्रकृतीची काळजी घ्या. कामात मन रमवून वेळ घालवाल.
कुंभ : विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवेल. व्यवसायात प्रयत्न केल्याशिवाय यश नाही हे लक्षात येईल.
मीन : कामातील प्रगती समाधानकारक राहील. नोकरीत जादा कामाची तयारी असेल तर वरकमाई करता येईल.