पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरो व्यापारी मेहुल चोक्सी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
चोक्सीचा भारतीय नागरिक नसल्याचा दावा आता भारतीय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले असून त्यासंबंधीत कागदपत्रेही डोमनिका कोर्टासमोर सादर केली आहेत. यामुळे मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठीची प्रत्यापर्ण प्रक्रिया लवकर होण्याची शक्यता आहे.
The affidavit filed by Indian authorities before the Dominica High Court states that fugitive diamantaire Mehul Choksi is still an Indian citizen and is erroneously claiming renunciation of the Indian Citizenship under the Citizenship Act, 1955.
— ANI (@ANI) June 14, 2021
डोमनिका उच्च न्यायालयासमोर भारतीय अधिकाऱ्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, फरार हिरो व्यापारी मेहुल चोक्सी अद्यापही भारतीय नागरिक आहे त्याने नागरिकत्व कायदा १९५५ अन्वये बनाव करत भारतीय नागरिकत्व सोडण्याचा दावा केले आहे.
परंतु त्याचा भारतीय नागरिकत्व सोडण्याचा अर्ज फेटाळण्यात आला आहे अशी माहिती भारतीय उच्चायुक्त कार्यालयात वाणिज्य अधिकारी यांनी डोमनिका न्यायालयाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिली आहे. भारत सरकारने यापूर्वीच अँटीग्वा सरकारचा मेहुल चोक्सी याचे नागरिकत्व रद्द करण्याचा मुद्दा उचलून धरला होता.
कायदे अंमलबजावणी एजन्सींकडून होणाऱ्या चौकशीपासून वाचण्यासाठी मेहुल चोक्सी याने बनावट नागरिकत्व मिळवून भारतातून पलायन केले. परंतु मेहुल चोक्सी याचे भारतीय नागरिकत्व अद्याप संपलेले नाही त्यामुळे भारतीय नागरिकत्व सोडून देण्याचा त्याचा दावा भारतीय कायद्याच्या विरोधात असून पूर्णपणे चुकीचा आहे.
तसेच मेहुल चोक्सी एक बोगस व्यक्ती असल्याचे भारतीय अधिकाऱ्याने डोमिनिका कोर्टात म्हटले आहे.