मंचर – मंचर (ता.आंबेगाव) येथे मंगळवार दि.९ रोजी गुढीपाडव्या निमित्त हिंदू नववर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या असलेल्या शोभायात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल-दुर्गा वहिनी आंबेगाव तालुका व सर्व सल्लग्न संस्था यांच्या विद्यमाने करण्यात आले आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा मंगळवार दि. ९ रोजी दुपारी ३ वाजता मंचर बाजारपेठेतील श्रीराम मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. शोभायात्रेचे हे २०वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे यंदाही सर्व हिंदू बांधव, माता, भगिनींनी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
शोभायात्रेत यावर्षी हिंदू धर्मावर आधारित वेगवेगळे धार्मिक चित्ररथ पाहायला मिळणार असून, महापुरुषांचे देखील चित्ररथ असणार आहेत. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री ८ वाजता आल्यानंतर भव्य धर्मसभा होणार आहे.
या धर्मसभेस विश्व हिंदू परिषद केंद्रीय प्रमुख मठ मंदिर अर्चक पुरोहित अरुण नेटके आणि डॉ. सुरेश चव्हाण हे संबोधित करणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषद मंचर प्रखंड मंत्री अक्षय जगदाळे व बजरंग दल मंचर प्रखंड संयोजक सागर भोर यांनी दिली.