पुणे – महापालिकेकडून येत्या मंगळवारी (दि.21) रोजी वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्यांची जोडणी तसेच काही जलवाहिन्यांच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील बहुतांश उपनगरांमध्ये पाणी बंद ठेवण्यात येणार आहे. यात, वारजे, उत्तमनगर, शिवणे, कोथरूड, कर्वेनगर, पाषाण, औंध, बाणेर, बालेवाडीचा समावेश आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी (दि.22) रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी कळविले आहे.
या भागात पाणी राहणार बंद
एसएनडीटी एचएलआर टाकी परिसर- हॅपी कॉलनी गल्ली क्र. 4, नवीन शिवणे, रामबाग कॉलनी, काशिनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय परिसर, केळेवाडी, हनुमान नगर स्लम, रामबाग कॉलनी परिसर, एम. आय. टी. कॉलेज रोड डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसा. यशश्री सोसा. सीमा, एम. आय. टी. कॉलेज रोडमागील बाजू, कानिफनाथ, जीवनछाया सोसा, एल.आय.सी. कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, शिवतीर्थ नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, वनाज कंपनीमागील भाग, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वडारवस्ती,
श्रमिक वसाहत गल्ल्या, स्टेट बॅंक कॉलनी, वनदेवी संपूर्ण परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, मावळे आळी बौद्धविहारपर्यंतचा संपूर्ण परिसर, गोसावी वस्ती, पृथ्वी हॉटेलमागील भाग, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी, आनंदनगर, मधुर कॉलनीचा भाग, आयडियल कॉलनी भाग, पौड रोडची डावी बाजू महागणेश सोसा., इशदान सोसा. सर्वत्र सोसायटी, प्रशांत न्यु. अंजठा, प्रतिक नगर, मधुराज नगर, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, डी. पी. रस्त्याची डावी बाजू शिवशक्ती सोसा ते 20 ओजस सोसायटीपर्यंत
चतुश्रुंगी टाकी परिसर
सकाळ नगर औंध रोड, आय टी आय रोड, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हणमळा भाग, लमाणतांडा बस्ती, पाषाण गावठाण काही भाग, चव्हाण नगर पोलीस लाईन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेजपर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे बस्तीपर्यंत, बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत .
बाणेर-बालेवाडी टाकी –
मोहननगर, लक्ष्मण नगर, राम नगर- राम इंदू पार्क, बालेवाडी गावठाण, दसरा चौक परिसर, पाटील नगर शिवनेरी पार्क, सन हॉरीझन, हाई- स्ट्रीट परिसर, नंदन प्रोसपेरा, 43 प्रायवेट ड्राईव्ह, मधुबन सोसायटी परिसर कुणाल एस्पायर, बिट वाईज परिसर, एफ रेसिडन्सी, पार्क एक्सप्रेस परिसर, आयवरीस टॉवर.
कोंढवे धावडे टाकी परिसर –
कोंढवे धावडे गावठाण, खडकवस्ती, नंबर गेट, टेलिफोन एक्सचेंज परिसर, न्यू कोपरे संपूर्ण परिसर, उत्तमनगर गावठाण, उर्वरित परिसर, पोकळेनगर, इंडस्ट्रीयल एरिया शिवणे गावठाण, शिवणे संपूर्ण परिसर इंगळे कॉलनी परिसर.