आजचे भविष्य (शनिवार, 19 जून 2021)

मेष : हाती असलेल्या कामांना गती मिळेल. नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही.

वृषभ : नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना? याची काळजी घ्या.

मिथुन : व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरी कामाचा झपाटा चांगला राहील.

कर्क : आर्थिक व इतर बाबतीत झालेली कुचंबणा कमी होईल. नवीन कामे मिळाल्याने तुमची उमेद वाढेल.

सिंह : नोकरीत रटाळ काम संपवण्याकडे तुमचा कल राहील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील.

कन्या : व्यवसायात नवीन कामाच्या संधी दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका.

तूळ : जुनी येणी वसुल करण्यावर भर राहील. खर्चासाठी तात्पुरता बचतीतील पैशाचा वापर करावा लागेल.

वृश्‍चिक : तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल.

धनु : नोकरीत अत्यावश्‍यक कामांना प्राधान्य द्याल व इतर कामे सोयीस्करपणे लांबणीवर टाकाल.

मकर :
नवीन कामे ओळखीतून मिळतील. नोकरीत कामानिमित्ताने जादा अधिकार मिळतील.

कुंभ : प्रवास घडेल. नोकरीत परदेशगमनाची संधी चालून येईल. लाभ घ्या. वरिष्ठ न मागता कामात सवलती देतील.

मीन : विचार व कृती यांची योग्य सांगड घालाल. कामे पूर्ण करता येतील. भांडवलाची तरतूद होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.