नवी दिल्ली – गुजरातमधील काम सुरु असलेली तीन मजली इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Gujarat: Three persons died after an under-construction building collapsed in Bawamanpura in Vadodara late last night. Rescue operation underway. pic.twitter.com/7xE1i1Xvjc
— ANI (@ANI) September 28, 2020
स्थानिकांच्या माहितीनुसार, बडोद्यातील बावानानपूरा येथील काम सुरू असलेली तीन मजली इमारत कोसळली. सर्वप्रथम ही इमारत एका बाजूला झुकली होती. लोकांनी याबाबत त्याची तक्रारही केली. परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अखेर सोमवारी मध्यरात्री अचानक ही इमारत कोसळली.
दरम्यान, महिनाभरापूर्वीही अहमदाबादमध्ये एक व्यावसायिक इमारत कोसळली होती. त्यामध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.