पॅलेस्टाइन व अरबांचा प्रदेश इस्रायलने सोडावा
राष्ट्रसंघ, दि. 18 – पॅलेस्टाइन आणि अरब प्रदेशातून इस्रायलने मागे हटावे, अशी मागणी भारताने आज पुन्हा एकदा राष्ट्रसंघाच्या आमसभेत करून आपली भूमिका स्पष्ट केली.
आज इंदिराजींचा वाढदिवस
नवी दिल्ली – पंतप्रधान इंदिरा गांधी 60 व्या वर्षात पदार्पण करतील. त्या आपला वाढदिवस अरुणाचल राज्यातील तिराप जिल्ह्यातील खोसा गावी आदिवासींच्या सहवासात साजरा करतील. भारतीय लोकांच्या कल्याणाकरता आपण करत असलेल्या अविश्रांत प्रयत्नांना मी सुयश मानतो, असे युगोस्लाव्हियाचे पंतपधान मार्शल टिटो यांनी अभिनंदनाच्या संदेशात म्हटले आहे.
लग्नात भेटवस्तू देण्यावर निर्बंध
बंगलोर – विवाह कायद्यात दुरुस्ती करण्याची तरतूद असलेले एक विधेयक आज कर्नाटक विधानसभेत मंजूर केले. लग्नसमारंभात वर वा वधूच्या मातापित्यांखेरीज इतरांनी भेटी देण्यावर बंदी असावी, अशा दुरुस्तीसह ते मंजूर झाले. हा भेटवस्तूबाबतचा नियम मोडणाऱ्यास 500 रूपये दंड वा 3 महिने कैद वा या दोन्ही शिक्षा देण्यात याव्यात अशी तरतूद यात आहे. लग्नाची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्याची सक्तीही एका विधेयकान्वये करण्यात येणार आहे.
चालू पिढीतच समाजवादाचे स्वप्न साकार होईल
मुंबई – देशात चालू पिढीच्या जीवनातच समाजवादी समाजरचनेचे स्वप्न साकार होईल, अशी आशा कॉंग्रेसचे व्ही. बी. राजू यांनी व्यक्त केली.