मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रयातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पोलीस कर्मचारी काही दिवसापासून येथे कार्यरत आहेत. याआधी मातोश्रीवरील ठेल्यावर चहा विक्रेत्याला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे करोना मुख्यमंत्र्यांच्या दारावर गेल्याचे पाहायला मिळत आहे.
मातोश्रीबाहेर गेटवरील सुरक्षा रक्षक काम करणाऱ्या तीन पोली कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते.
दरम्यान, मातोश्रीवरील चहावाला करोनावर मात करुन नुकताच परतला आहे. मात्र आता “मातोश्री’बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.