मुंबई – ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन प्रकार सापडल्याने जगभरतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतासह अनेक देशांनी ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. आज रात्रीपासून युकेतून भारतात येणाऱ्या विमानांना बंदी लागू असणार आहे.
“काल रात्री आणि आज (22 डिसेंबर) दिवसभरात मिळून तीन फ्लाईट आल्या आहेत. अजून आज रात्री एक फ्लाईट येणार आहे. तीन फ्लाईटमध्ये एकूण 600 प्रवासी आले आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारंटाईन करण्यात आले असून या प्रवाशांची पाच दिवसानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येईल. सध्यातरी या घडीला आलेल्या प्रवाशांपैकी कुणीही पाॅझिटिव्ह नाही,” अशी माहिती मुंबईचे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
युकेतून तसेच देशांतर्गत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांकडे करोना चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे. रिपोर्ट नसेल तर प्रवास करता येणार नाही. तसेच युकेतून येणाऱ्या फ्लाईट आज रात्रीपासून बंद होणार आहेत, असेही काकाणी यांनी सांगितले आहे.