ममतांचं सरकार पाडण्याचं भाजपचं षडयंत्र! गरज पडल्यास शरद पवार घेणार ‘हा’ निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई – पश्चिम बंगालमधील सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र भाजप रचत आहे. राज्य सरकारांच्या अधिकारांचे हनन करून राजकीय फायदा उठवण्याचे काम भाजपकडून होत आहे. निवडून आलेलं सरकार पाडणं हा योग्य कार्यक्रम नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. 

याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यात चर्चा झाली. गरज पडल्यास शरद पवार स्वत: प. बंगालला जातील व विरोधकांना एकजूट करण्याचे काम करतील, अशी माहिती मलिक यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.