बिजापूर (छत्तीसगड) – छत्तीसगडच्या विजापूरमध्ये सुरक्षा दलाबरोबर सुरू असलेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. तेलंगणा-छत्तीसगड सीमेवरील पुजारी कांकेरच्या करिगुटा जंगलात ही चकमक झाली. ती अजूनही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्तीसगड पोलिसांच्या मदतीने तेलंगणाच्या ग्रेहाऊंड्सच्या नेतृत्वाखाली ही नक्षलविरोधी मोहिम राबवण्यात आली. घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि त्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.हलकी मशीन गन (एलएमजी) आणि एके-४७ सह काही शस्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत.
तत्पूर्वी, शुक्रवारी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.सध्या सुरक्षा दलांनी छत्तीसगड मधील नक्षलवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू असून त्यात अनेक नक्षलवादी ठार होत आहेत.