दुर्घटनेत एक जवान बेपत्ता
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या उत्तरेला काही भागांमध्ये हिमकडा कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. कुपवारा, बारामुल्ला आणि गंदरबाल या सेक्टरमध्ये मंगळवारी हिमकडे कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
Army Sources: Due to heavy snowfall in the last 48 hours, there have been multiple avalanches in the North Kashmir areas after which a number of soldiers have been rescued. 3 soldiers have lost their lives while one is still missing. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) January 14, 2020
हिमकडे कोसळलेल्या त्या भागामध्ये भारतीय लष्कर आणि अन्य सुरक्षा दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जवान बेपत्ता आहे. दरम्यान, बेपत्ता जवानाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.