पुणे – शहरात नव्या करोना बाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. दिवसभरात 328 बाधितांची नोंद केली. तर 3 हजार 053 स्वॅब टेस्ट झाल्या.
गेल्या आठवडा-दीड आठवड्यापासून तीनशेच्या आत असलेली बाधितांची संख्या आता तीनशेच्या पुढे गेली आहे. त्यामुळे अधिक चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, दुसऱ्या लाटेचे हे संकेत तर नव्हे ना अशी शंका उपस्थित होत आहे.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही दिवसभरात 23 असून, त्यातील पाच रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी 4293 आहे. 494 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यातील 290 व्हेन्टिलेटरवर आहेत.
तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 5,641 आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 62 हजार 419 झाली असून, डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 1 लाख 52 हजार 485 आहे. दिवसभरात 316 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.