नगर -जिल्ह्यात आज 192 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 863 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 95.97 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 260 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1426 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये 39, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 79 आणि अँटीजेन चाचणीत 142 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 18, नगर ग्रामीण 07, पारनेर 03, पाथर्डी 03, शेवगाव 02, श्रीरामपूर 01, कॅंटोन्मेंट 02, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.