रोम – गेल्या गुरुवारी इटलीची राजधानी असलेल्या रोम शहरामध्ये एक अतिशय विचित्र घटना पाहायला मिळाली. शहरातील हजारो कावळ्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर जोरदार हल्ला चढवला सध्याच्या उन्हाळ्याच्या मोसमामध्ये पाऊस नसताना किंवा उन्हाळा कमी असतानाहि या हल्ल्यांपासून वाचण्यासाठी अनेक नागरिक छत्र्या घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत होते.
गेल्या काही महिन्यांमध्ये रोम शहरातील कावळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कावळ्यांनी लोकांवर हल्ला करण्याचे प्रमाणही वाढले आहे
कावळेनी केलेल्या या हल्ल्यामुळे अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांचे केस चोचीने उपटणे , डोक्यावर चोच मारणे आणि आपल्या नखांनी नागरिकांचे कपडे काढणे अशा प्रकारचे हल्ले कावळे करत आहेत. रोममध्ये दरवर्षीच वसंत ऋतुमध्ये कावळ्यांची संख्या वाढत असते.
या कालावधीमध्ये कावळे माणसाला आपला सर्वात मोठा शत्रू मानतात. आपल्या पिलांना या माणसांपासून धोका आहे. या भावनेतून मोठे कावळे नागरिकांवर हल्ले करत असतात. शहरातील कावळ्याची ही दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की कावळ्यांची संख्या जास्त असलेल्या शहरातील काही वसाहतीमध्ये जाणेही लोकांनी आता सोडून दिले आहे.