झाकीर मुसाच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी; दगडफेक सुरु

श्रीनगर – अलकायदाशी संबंधीत झाकीर मुसा नवाच्या दहशतवाद्याची चकमकीत हत्या झाल्यानंतर काश्‍मीरच्या बऱ्याच भागात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. शैक्षणिक संस्था आणि अन्य महत्वाचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अशातच वृतसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, झाकीर मुसाच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी झाली होती. गर्दीतील काही तरुणांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या असून काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडले.

दरम्यान, काश्‍मीरच्या बऱ्याच भागात तणावाची स्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काही ठिकाणची इंटरनेट सेवाहीं बंद करण्यात आली आहे. त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसा आपल्या दोन अन्य दहशतवाद्यांसह ठार झाला आहे. तो अलकायदाशी संबंधीत असलेल्या अन्सार गझवात उल हिंद या विघटनवादी संघटनेचा प्रमुख म्हणून काम करीत होता. त्याच्या मृत्युच्या वृत्तानंतर शोपिया, पुलवामा, अवंतीपोरा, आणि श्रीनगर मध्ये जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.