जामखेड (प्रतिनिधी) – शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना आता जामखेड पोलिस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. जामखेड पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील पोलीस कर्मचाऱ्यांनीची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी जामखेड पंचायत समितीतील एक अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली असून पंचायत समिती ५ दिवस बंद करण्यात आली आहे. सध्या शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८० च्या घरात गेली आहे. दिवसेंदिवस वाढत चालेल्या कोरोनाबंधितांमुळे तालुक्यातील वातावरण चिंतादायक झाले आहे.
काल रात्री तालुक्यातील १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. या अहवालात पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःहून आरोळे हॉस्पिटल येथे जाऊन तपासणी केली त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर जमखेड पोलीस स्टेशन मध्ये एकच खळबळ उडाली होती त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. पोलिस दलात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाकडून घेण्यात आला आहे .