बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोडप्यांच्या लग्नाच्या आणि सारखपुड्याची चर्चा सुरू आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने आपली कथित गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायसोबत साखरपुडा उरकला असल्याचे समजते. अलीकडेच दोघांनीही एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्यानंतर यांचा साखरपुडा झाला असल्याच्या चर्चेने जोर पकडला. याबाबत आता खुद्द नीलम उपाध्यायने खुलासा केला आहे.
सिद्धार्थला त्याची कथित मैत्रिणीसह बऱ्याचदा स्पॉट करण्यात आले होते. त्यातच नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सिद्धार्थ चोप्रासमवेत नीलमला आली होती. तेव्हा तिच्या बोटात अंगठी पाहून दोघांनी साखरपुडा केल्या असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, ही अफवा असल्यचे नीलमने सांगितले.
नीलम उपाध्यायने अंगठीबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलेले की, असे काहीही नसून या सर्व अफवा आहेत. ही अंगठी माझ्या उजव्या हाताच्या बोटात आहे. अर्थात, आमचा साखरपुडा झालेला नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असे तिने सांगितले.
दरम्यान, नीलम आणि सिद्धार्थ यांचे कौटुंबिक संबंध खुपच जवळचे मानले जातात. याबाबत स्वतः प्रियांका चोप्राने सांगितले होते. तिने होळीच्या प्रसंगाचे काही छायाचित्रे इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहेत. ज्यात प्रियांका-सिद्धार्थ तिच्या आईसह नीलमच्या कुटूंबासह दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वी सिद्धार्थचा 2 वेळा साखरपुडा झालेला आहे.