फॉरेस्ट ग्रीन साडीतील ‘मलायका अरोरा’ दिसते खरोखरच लाजबाब; फोटो व्हायरल…

मुंबई – बॉलिवूड म्हणजे फॅशन, असे समीकरण आहे. तर फॅशन आणि ग्लॅमरस म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा असे समीकरण आहे.

फॅशनेबल आणि स्टायलिश मलायका अरोरा नेहमीच वेस्टर्न ड्रेस परिधान करून क्‍लासी लूक ट्राय करताना दिसते. पण भारतीय पारंपरिक रूपातही ती सुंदर दिसते. 

मलायकाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या नव्या मल्टी सेक्‍विन फॉरेस्ट ग्रीन साडीतील लूक खरोखरच लाजबाब आहे. मलायकाचा हा सिजलिंग लूक नवरात्रीतील दांडियात ग्लॅमरचा तडका लावणारा आहे. 

मलायकाने ही सुंदर साडी परिधान करत नुकतंच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. मलायकाच्या स्टायलिस्टने मल्टी सेक्‍विन फॉरेस्ट ग्रीन साडीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये मलायकाने तिच्या सुंदर केसांना साइड- पार्टेड हेअरस्टाइलमध्ये मोकळं सोडलंय, तर चेन लिंक नेकपीस आणि ब्रेसलेटसह लूक दिसतो. या फोटोंमध्ये मलायकाने फॉरेस्ट ग्रीन

रंगाचा ब्लाउज आणि फ्लॉवर प्रिंटेड साडीतील लूक कॅरी केला आहे. तिचा हा साडीतील लूक आज नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हिरव्या रंगाची साडी परिधान करणाऱ्या महिलांसाठी खास आहे. 

बऱ्याच वेळा महिलांकडे अनेक हिरव्या रंगाच्या साड्या असतात पण कपाटातच. कारण लग्नकार्य, विशेष कार्यक्रमात हिरव्या साड्या घालणे महिलांना फारसे आवडत नाही. 

त्यामुळे आजच्या खास दिवशी एखादी हिरवी साडी परिधान करून चारचौघीजणींत उठून दिसाल. मलायकाची साडी नेसण्याची फॅशनही ट्राय करायला हरकत नाही. कारण साडीत स्त्रीचे रूप आणखी खुलते हे महिलांना सांगावे लागत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.