बॉलिवुडमध्ये 2018मध्ये प्रदर्शित झालेल्या “वीरे की वेडिंग’ या रोमांटिक कॉमिडी चित्रपटात एकत्रित झळकलेले पुलकित सम्राट आणि कृति खरबंदा पुन्हा एकदा मल्टी स्टारर कॉमिडी “पागलपंती’ चित्रपटात सोबत काम करणार आहेत. सध्या ही जोडी लिव इन पार्टनरमुळे चर्चेत आली आहे. या दोघांमधील रोमांसची चर्चा गतवर्षी वरुण शर्माच्या बर्थडे पार्टीपासून सुरू आहे.
यावर्षीच्या प्रारंभी लंडनमध्ये “पागलपंती’चे शूटिंग सुरू झाल्यापासून दोघांमधील संबंध अधिक दृढ झाले आहेत. कृति आणि पुलकित यांनी त्या 58 दिवसांच्या शेड्यूलदरम्यान लंडनमध्ये एकत्रितपणे बराच वेळ घालविला होता. हे दोघे एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. तसेच दोघेही एकाच जिम ट्रेनरकडे एकत्रित वर्कआउट करत होते. तसेच कृतिला साउथ इंडियन फूड आवडते आणि ती पुलकितसाठी सेटवर सतत घरचेच जेवन पाठवत होती.
दरम्यान, पुलकित सम्राट याने नोव्हेंबर 2015मध्ये आपली पत्नी श्वेता ताहिरासोबत विभक्त होत तलाकही घेतलेला आहे. “वीरे की वेडिंग’च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी त्याला लग्नाबद्दल विचारले असता पुलकित म्हणाला, मला असे वाटते की दुस-या कोणावर प्रेम करण्यापेक्षा पायळू कुत्रावर प्रेम केलेले कधीही चांगले.