मुंबई – मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ यांच्या या बंडानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. आणि त्यामुळेच का होईना ‘एकनाथ शिंदे’ हे नाव सर्वदूर परिचयाचे झाले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून, त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी केक कापत त्यांचा जोरदार वाढदिवस साजरा केला आहे. अश्यातच ‘धर्मवीर’ या चित्रपटाची निर्मितीची धुरा संभणारे अभिनेते मंगेश देसाई यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘धर्मवीर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय हा चित्रपट करत असताना मंगेश देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा होता. मंगेश देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. हा फोटो शेअर करत त्यांनी एक किस्साही सांगितला आहे.
काय आहे? अभिनेते मंगेश देसाई यांची खास पोस्ट…!
View this post on Instagram
साहेब तुमच्या विषयी काय लिहू ??!!! किती लिहू !!!शब्द अपुरे आहेत पण भावना खूप आहेत आणि त्या शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाहीत. पण आज एक प्रसंग आठवतो , 2009 साली तुमच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा चा फोन केला होता आणि एक भावना व्यक्त केली होती “तुम्ही मुख्यमंत्री व्हावं “तुम्ही हसला होतात ‘आणि हे कसं शक्य आहे मंगेश? असं म्हणाला होतात.
पण माझ्या सारख्या अनेक लोकांनी हीच भावना देवा जवळ मनापासून बोलून दाखवली असणार आणि देवाने ती साठवून ठेवली असणार. तुम्ही मुख्यमंत्री झालात ,जनतेचे आवडते झाला आहात. मुख्यमंत्री झाल्यानंतर चा हा वाढदिवस .या पुढील प्रयेक वाढदिवस तुमच्या आयुष्यात नवनवीन शक्ती देणारा ठरो हीच देवाकडे प्रार्थना. तब्येतीची काळजी घ्या .कामा बरोबर आराम पण करा आणि शक्तिशाली व्हा.!