पुणे- सराईत गुन्हेगार सुलतान शेख (19,रा.येरवडा) याला समर्थ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन वाहनचोरी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि.15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने हद्दीत प्रट्रोलींग करीत असतांना तपास पथकातील पोलीस अंमलदार सुमित खुट्टे यांना खबर मिळाली की, नाना पेठ आझाद आळी मध्ये एक व्यक्ती मोबाईलची विक्री करणे करिता येणार आहे. त्यानूसार सापळा रचून सुलतानला ताब्यात घेण्यात आले. त्याचे जवळील मोबाईल बाबत चिवारणा केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास अधिक चौकशी कामी समर्थ पोलीस स्टेशन येथे आणले. त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता, सदरचा मोबाईल त्याने नाना पेठ येथुन चोरल्याचे सांगितले.
सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन कडील अभिलेख पडताळुन पाहिला असता समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच त्यास विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने साधारण दिड महिन्यापूर्वी गणेश पेठ येथून हिरो होंडा पॅशन प्लस ही गाडी चोरले बाबत सांगीतले. यासंदर्भात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
तसेच त्याने दोन दिवसापूर्वी सासवड येथून पार्कीग मधून होंडा डिओ ही गाडी व नायडू हॉस्पीटल जवळ एक मोबाईल चोरी केलेबाबत सांगीतले. आरोपीकडे एकंदरीत आणखी तीन मोबाईल मिळून आलेने सदरच्या मोबाईल मालकांचे शोध घेण्याचे काम चालू आहे.
ही कामगिरी उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सतिश भालेराव, पोलीस अंमलदार जितेंद्र पवार धिरज शिंदे, सुमित खुट्टे, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे निलेश साबळे, विठ्ठल चोरमले, महेश जाधव यांच्या पथकाने केली आहे.