मुंबई – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची घुसमट होत असल्याचे बोलले जात आहे. अमोल कोल्हे पक्ष्याच्या कार्यक्रमांना आणि बैठकांना देखील दांडी मारत असल्याचं चर्चा मध्यंतरी सुरु होत्या.
मात्र, आज त्यांनी अशी एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून एकच चर्चेला उधाण आलं आहे. या पोस्टमुळे अमोल कोल्हेंचा आता राष्ट्रवादीकडून भाजपाकडे तर प्रवास सुरु झाला नाहीय ना.? असा अंदाज वर्तवला जात आहे. अमोल कोल्हेंच्या त्या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. अमोल कोल्हेंच्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
View this post on Instagram
आज सर्वत्र जागतिक पुस्तक दिन साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त सर्वच जण पुस्तकांचं वाचन करण्याची प्रेरणा देत आहेत. अश्यातच अमोल कोल्हे यांनीसुद्धा आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पण या फोटोमुळे आता भलतीच चर्चा सुरु झाली आहे.
विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?#WorldBookDay #WorldBookDay2023 pic.twitter.com/o9EXHoPLcf
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 23, 2023
शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अमोल कोल्हे यांनी दोन फोटोंचा एक कोलाज बनवलेला आहे. या फोटोमधील पहिल्या फोटोमध्ये अमोल कोल्हे शरद पवार यांचं ‘नेमकेच बोलणे…’ हे पुस्तक अभ्यासात असताना दिसून येत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘द न्यू बीजेपी’ हे पुस्तक वाचत आहेत. या फोटोसोबत ‘विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?’ असे कॅप्शनही अमोल कोल्हे यांनी या पोस्टला दिले आहे.
आता या दुसऱ्या फोटोवरुन राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. अमोल कोल्हे पुस्तकाच्या माध्यमातून बीजेपीबाबत काही हिंट तर देण्याचा प्रयत्न करत नाहीयेत ना.? असा संशय सर्वांना येत आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सगळीकडे तुफान व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहे.