बामका – मालीच्या मध्य प्रांतातल्या लष्करी तळाजवळ झालेल्या हल्ल्यामध्ये किमान 10 जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले आहेत. मोपती भागातल्या सेवारे गावातल्या लष्करी तळाजवळ एका कार बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात आजूबाजूच्या काही घरांचे नुकसान झाले आणि काही लोक मारले गेले, असे मालीच्या लष्करी प्रवक्त्यांनी सांगितले.
या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र या भागात सक्रिय असलेल्या जिहादींनी हा स्फोट घडवला असावा, असा अंदाज आहे. या लष्करी तळावर जिहादींनी यापूर्वीही हल्ला केला होता. तरी या वर्षातला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. या तळामध्ये रशियाला लष्करी मनुष्यबळ पुरवणाऱ्या वॅगनर ग्रुपचे सैनिक देखील आहेत. वॅगनर ग्रुपचे सैनिक गेल्या वर्षभरापासून मालीच्या सैन्याबरोबर जिहादींशी मुकाबला करत आहेत.
मालीमध्ये शनिवारी झालेल्या एका अन्य घटनेमध्ये राजधानी बामकोमधेये लष्कराचे एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेमध्ये कोणाचा मृत्यू झाला की नाही हे समजू शकलेले नाही.