मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती 11 कोटी 38 लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बॅंक ठेवी 10 कोटी 36 लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरेंनी आज वरळीमध्ये आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपली एकूण संपत्ती 11 कोटी 38 लाख असल्याचे म्हटले आहे. संपत्तीचे विवरण देताना त्यांनी बॅंकेमध्ये 10 कोटी 36 लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये 20 लाख 39 हजारांची गुंतवणूक करण्यात आली असून आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्यू गाडी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या गाडीची एकूण किंमत 6 लाख 65 हजार रुपये असल्याचे म्हटले आहे. आदित्य यांनी आपल्याकडे 64 लाख 65 हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण 10 लाख 22 हजारांची असल्याचे आदित्य यांनी सांगितले आहे.