बॉलीवूड अभिनेता बोमन इराणी हे एक उत्तम आणि पूर्णतः प्रोफेशनल अभिनेते आहेत. त्यांनी अलीकडेच “मेड इन चायना’ हा आगामी चित्रपट स्वीकारला आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि त्यातील डॉ. वर्धी या युनिक व्यक्तिरेखेविषयी खूप उत्साहित झाले.
दुर्दैवाने, त्यांना चित्रीकरणाची सुरुवात होण्यापूर्वीच स्लीप डिस्कच्या आजाराने ग्रासले. पण हा चित्रपट दिवाळीपूर्वी प्रदर्शित होणार असल्यामुळे चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलणे अशक्य होते. कारण चित्रपटातील अन्य कलाकारांच्या तारखा निश्चित झालेल्या होत्या. मग काय, आपल्या दुखण्यासह बोमन सेटवर हजर झाले. चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांना ही गोष्ट खूपच भावली. त्यांनीही मग बोमनला आराम कसा मिळेल याचा विचार सुरू केला.
बोमन जेव्हा ट्रीटमेंट घेताना बेल्ट बांधून बसत असत तेव्हा डॉ. वर्धी ही व्यक्तिरेखा त्याच स्थितीशी जोडून घेऊन चित्रित करण्यात आली. त्यामुळे बोमन यांच्या मणक्यावर जास्त भार पडला नाही. उलट अभिनयात समरसून गेल्यामुळे त्यांना आपल्या दुखण्याचाच विसर पडला. डॉ. वर्धी ही एका वृद्ध व्यक्तीची भूमिका आहे.
Iss Diwali, phootega pataka, aur hoga #IndiaKaJugaad ka dhamaka! ?
3 Days To Go for #MadeInChinaTrailer!#DineshVijan @MusaleMikhil @RajkummarRao @Roymouni @raogajraj @SirPareshRawal @vyas_sumeet @AmyraDastur93 @MaddockFilms @jiostudios @JioCinema @SachinJigarLive pic.twitter.com/JmzZN27lih— Boman Irani (@bomanirani) September 15, 2019