वॉशिंग्टन – उत्तर कोरियाच्या निःशस्त्रीकरणासाठी सुरू असलेल्या चर्चेच्या प्रक्रियेमध्ये अन्य देशांना सहभागी करून घेण्यास अमेरिकेची तयारी नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी नुकतीच ही माहिती दिली.
उत्तर कोरियाबरोबरच्या चर्चेतून कोणत्याही देशाला वगळण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात नाही आहे. मात्र तसा अमेरिकेचा प्रयत्नही नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले. किम जोंन उन यांनी आतापर्यंत अमेरिकेबरोबर थेट समोरासमोर चर्चेलाच पसंती दिली आहे. त्याप्रमाणे तशीच चर्चा घडवून आणली गेली आहे, असे जॉन बोल्टन म्हणाले. किम यांच्याबरोबर तिसरी शिखर परिषद घेण्यास ट्रम्प यांची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
किम यांनी अलिकडेच रशियाचा दौरा केला. त्यामध्ये किम यांच्याशी बहुराष्ट्रीय चर्चेचा प्रस्ताव रशियाचा अध्यक्ष व्लादिमिर पुतीनयांनी दिला होता. त्यावर अमेरिकेकडून ही प्रतिक्रिया दिली गेली आहे.